corona_20esakal. 
देश

Coronavirus Updates :कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख घसरता, जाणून घ्या आजची आकडेवारी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली India Coronavirus Updates : कोरोना विषाणू जगासमोर येऊन आता जवळजवळ १  वर्षाचा कालावधी झाला आहे, पण अजूनही ही महामारी संपण्याचं नाव घेत नाहीये. पण, काही देशांनी या विषाणूपासून आपली सूटका करुन घेतली आहे, तर काही देश अजूनही महामारीविरोधात लढत आहेत. भारतापुरतं पाहायचं झालं तर देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनो विषाणूचा आलेख उतरता राहिला आहे. बुधवारी म्हणजे १६ डिसेंबरला मागील २४ तासात कोरोना विषाणूचे २६,३८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ३८७ लोकांचा मृत्यू झाला आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 

बिहारमध्ये कोरोना लस मिळणार फ्री; नव्या 20 लाख रोजगारांचीही घोषणा

देशात सध्या ३,३२,००२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ९० लाखांच्या पार केला आहे.  देशात आतापर्यंत ९९,३२,५४७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात १,४४,०९६ लोकांना कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमावावा लागला आहे. रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या पुढे गेला असून देशात ३.३४ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ९४,५६,४४९ लोकांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या २४ तासात ३३,८१३ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी सकाळी ८ पर्यंतची ही आकडेवारी आहे.

कोरोना महामारीने हाहाकार माजवला असला, तरी गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत आहे.  भारतात मंगळवारी 22,065 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले होते, तर 354 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेले वर्षभर कोरोना नावाचा विषाणू संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालतो आहे. या विषाणूमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली होती. दिर्घ अशा लॉकडाऊननंतर काही ठिकाणची परिस्थिती आवाक्यात येत आहे. ब्रिटन देशांनंतर आता अमेरिकेनेही लसीकरणास सुरवात केली आहे. भारतातही लवकरच लशीला मान्यता मिळवून लसीकरणास सुरवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT